नवऱ्याचा दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये चालू होता रोमान्स अन् तितक्यात... Video व्हायरल!

extra marital affairs : नवरा हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रूममध्ये असताना...

Updated: Sep 20, 2022, 05:31 PM IST
नवऱ्याचा दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये चालू होता रोमान्स अन् तितक्यात... Video व्हायरल! title=

Viral Video : अनेकांचे लग्न झाल्यानंतर बाहेर अफेर (extra marital affairs) चालू असतात. बायकोच्या नकळत त्यांचं अफेर सुरू असतं. मात्र अफेरबाबत बायकोला समजतं तेव्हा मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळतो. एक्सट्रा मैरिटिअल अफेरमुळे काहींचे संसार उद्ध्वस्त होताना आपण पाहिले आहेत. अशातच एक व्हिडीओ व्हायरल (extra marital affairs Viral Video) होत आहे ज्यामध्ये पती दुसऱ्या महिलेसोबत सापडलेला दिसत आहे. त्यानंतर तिने चपलेने मारलं आहे. (trending extra marital affairs wife beat husband after he he with woman in hotel agra viral video)

नक्की काय घडलं? 
नवऱ्याचं बाहेर सुरु असलेल्या अफेरमुळे कंटाळून पत्नी माहेरी राहायला गेली होती. एक दिवस तिला माहिती मिळते की, तिचा नवरा महिलेसोबत एका हॉटेलमध्ये आहे. त्यानंतर ती भावाला घेऊन त्या हॉटेलला जाते. (Hotel Room Video Viral) हॉटेलमध्ये गेल्यावर नवरा दुसऱ्या महिलेसोबत असलेला दिसतो तेव्हा मात्र पत्नीचा पारा हलतो. 

पत्नी डायरेक्ट तिथेच चपलेने नवऱ्याला आणि महिलेला मारहाण करते. (wife beat husband) पत्नी जेव्हा मारहाण करत असते तेव्हा, चूक झाली माफ कर परत असं होणार नाही. फक्त एकदा माफ कर. त्यावेळी जी महिला सापडते तीसुद्धा माफी मागत असल्याचं दिसत आहे. इथून पुढे असं होणार नाही, मला माफ कर, अशी विनंती रडत रडत ती महिला करत आहे.

 

पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) गेल्यावर पत्नीने पोलिसांना सांगितलं की, माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेर असल्यामुळे मी माहेरी राहत होते. पती हॉटेलमध्ये असल्याची माहिती समजते तेव्हा आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यावर ती महिला पत्नीच्या भावावर खोटी केस टाकण्याची धमकी देते त्यामुळे तिला राग येतो आणि ती चपलेने मारायला सुरूवात करते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पत्नीच्या भावाने हा व्हिडिओही शुट केलेला होता. ही घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा इथली आहे.