Optical Illusion: जेम्सच्या गोळ्यात लपलेले बटण शोधून दाखवा, 99 टक्के लोक अपयशी ठरलेत

20 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेल बटण, तुम्हालाही उत्तर देता आलं नाही, तुमच्या मित्रांना द्या चॅलेंज 

Updated: Aug 27, 2022, 06:26 PM IST
Optical Illusion: जेम्सच्या गोळ्यात लपलेले बटण शोधून दाखवा, 99 टक्के लोक अपयशी ठरलेत title=

मुंबई :  सोशल मीडियावर दररोज फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही फोटो स्टार्सचे असतात,तर काही फोटो ऑप्टीकल इल्यूझनची असतात. असाच एक फोटो सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये लपलेली एक वस्तु तुम्हाला शोधायची आहे. ही वस्तु तुम्ही शोधलीत तर तुम्ही हूशार.  
 
फोटोत काय? 
या फोटोमध्ये तुम्हाला अनेक रंगीबेरंगी जेम्सच्या गोळ्या पाहायला मिळतील. या सर्वांच्या मध्यभागी एक बटण देखील लपलेले आहे, परंतु ते आपल्या डोळ्यांना सहज दिसणार नाही. संपूर्ण फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की हे कोडे सोडवणे अधिक कठीण होईल. हा फोटो तुमची वारंवार दिशाभूल करेल आणि योग्य उत्तर शोधण्यात अडथळे निर्माण करेल.

या फोटोमध्ये लपवलेले बटण शोधण्यापूर्वी तुमच्या फोनवर 20 सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. आता तुमच्यासमोर दोन आव्हाने आहेत, पहिले या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून बटण शोधणे आणि दुसरे म्हणजे २० सेकंदात या कामात यशस्वी होणे. फोटो सतत बघूनही तुम्हाला बटण दिसत नसेल, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा.

जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात, तर तुमचे अभिनंदन, तुमचे मन आणि डोळे खूप तीक्ष्ण आहेत. जर तुम्हाला उत्तर शोधण्यात यश आले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, फोटोच्या डाव्या बाजूला खाली हे बटण लपले आहे. काहींना हे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यात यश आले तर काही अपयशी ठरले आहेत.