Optical Illusion: 'या' फोटोत लहान मुलगा शोधून दाखवा,खुप लोक अपयशी ठरली

15 सेकंदात फोटोतला लहान मुलगा शोधून दाखवा,अनेकांना उत्तर देता आले नाहीए, तुम्हाला जमतंय का पाहा 

Updated: Aug 29, 2022, 06:17 PM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लहान मुलगा शोधून दाखवा,खुप लोक अपयशी ठरली title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये काही फोटो स्टार्सचे असतात तर काही फोटो ऑप्टीकल इल्यूजनचे असतात. आता असाचं एक ऑप्टीकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्हाला लहान मुलाला शोधायंच आहे. तुम्हाला हा लहान मुलगा या फोटोत शोधता येतोय का पाहा.  

ऑप्टिकल इल्युजन फोटोंमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपवल्या गेल्या असत्या की त्या डोळ्यासमोर असूनही दिसत नाहीत. बरेच लोक या वस्तू शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते सापडत नाहीत. पुन्हा एकदा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका लहान मुलाची प्रतिमा आहे. तुम्हाला या चित्रात मुलाची प्रतिमा शोधायची आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एका लहान मुलाची छबी अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की ती शोधणे फार कठीण आहे. जर तुम्हाला चित्रात मुलाची प्रतिमा दिसली तर खरचं तुम्ही हुशार आहात. पण तुम्हाला जर अजूनही या फोटोतली मुलाची प्रतिमा दिसली नसेल तर तुम्हाला आणखीण तिक्ष्ण नजर आणि बुद्धी आणखी सक्रिय करण्याची गरज आहे.  

हा व्हायरल फोटो पाहिल्यास त्यात एक तलाव दिसत आहे. या तलावाच्या काठावर एक जोडपं उभं राहून पाण्याकडे पाहत आहे. तलावाजवळ झाडे आणि खडक देखील आहेत. या छायाचित्रात जोडप्याशिवाय एक मूलही आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला बाळ दिसेल. जर तुम्हाला दिसत नसेल तर आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही बाळाला सहज पाहू शकता.