Jio मागोमाग आणखी एक कंपनी 5G Service देण्यास सज्ज, Launch Date आणि किंमतही ठरली

व्हा सज्ज सुपरफास्ट इंटरनेट सेवेसाठी, भारतात लवकरच 5G सेवा लाँच होणार

Updated: Aug 29, 2022, 05:32 PM IST
Jio मागोमाग आणखी एक कंपनी 5G Service देण्यास सज्ज,  Launch Date आणि किंमतही ठरली title=

Airtel 5G Launch Date and Price: देशात 5G इंटरनेट सेवा कधीपासून सुरु होणार यावर अनेक अपडेट्स येतायत. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यात पहिली बाजी मारली आहे ती रिलायन्स जिओ कंपनीने. रिलायन्स इंडस्ट्रीजची Reliance AGM 2022 आज पार पडली . या AGM मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली. रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा (Reliance 5G Internet) दिवाळीपासून सुरु होणार आहे. ही सेवा देशातील चार महानगरात सुरू होणार आहे.

Jio पाठोपाठ आता Airtel ने देखील त्यांच्या 5G सेवेबद्दल माहिती दिली आहे. लॉन्च तारखेपासून (Airtel 5G Launch Date) किंमतीपर्यंत (Airtel 5G Price) सर्व गोष्टींची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे. 

Airtel 5G Launch Date 
एअरटेल (Airtel) कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल (Sunil Mittal) यांनी भारतात एअरटेल 5G सेवांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशात एअरटेल 5G सेवा सुरु करेल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर 2022 पासून भारतात 5G सेवा सुरु होऊ शकते.

Airtel 5G Price in India 
बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार सुनील मित्तल यांनी एअरटेल 5G प्लान्सच्या किंमतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. 5G सेवा घेण्यासाठ एअरटेल ग्राहकांना थोडी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सुनील मित्तला यांच्या म्हणण्यानुसार कदाचित Airtel 5G साठी नवीन योजना आणणार नाहीत, एअरटेलच्या प्रीमियम प्लॅनमध्येच ही सेवा जोडली जाईल.