केंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त

 कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.  

Updated: Sep 23, 2020, 10:57 PM IST
केंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त  title=

नवी दिल्ली : कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले. संसद परिसर ते गांधी पुतळ्यापर्यंत खासदारांनी रॅली काढली. तसेच विरोधकांनी राज्यसभा सभापती वैकंय्या नायडू पत्र लिहले आहे. यात ही विधेयकं विरोधकांच्या गैरहजेरीत संमत करून घेऊ शकत नाही, असं विरोधकांनी मत मांडले आहे. दुसरीकडे खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली

पंजाबच्या लुधियानात अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या शेतकऱ्यांनी संसदेतं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांचा निषेध नोंदवला. लुधियानातल्या सावदी काला या गावात शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले.. अतिशय शिस्तब्ध पद्धतीनं त्यांनी कृषी विधेयकाविरोधात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 

काँग्रेसचे आंदोलन 

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पंबाजच्या अमृतसरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. नवज्योत सिंग सिद्धू यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केले. नवज्योत सिंग सिद्धूंनी ट्रॅक्टरवरुन मोर्चा काढला.. सरकारच्या या नव्या सुधारीत विधेयकामुळं शेतमालाच्या, अन्न धान्याच्या साठेबाजीला ऊत येईल असा आरोप सिद्धूंनी केला. 

 तृणमूलचे विद्यार्थी संघटना

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने शेतमाल हातात घेऊन आंदोलन केले. नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी नाडला जाईल असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने केला. यावेळी काही आंदोलकांनी कांद्याच्या आणि इतर भाजीपाल्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. कोरोना काळात सुरक्षित अंतर ठेवत हे आंदोलन करण्यात आले.