काळजात धस्स करणारा VIDEO! दोन खासगी बस एकमेकांवर आदळल्या आणि....

मृत्यू जवळून पाहिला.... भीषण अपघातात ड्रायव्हर सीटवरून उडाला आणि.... पाहा काळजात धस्स करणारा VIDEO

Updated: May 18, 2022, 01:22 PM IST
काळजात धस्स करणारा VIDEO! दोन खासगी बस एकमेकांवर आदळल्या आणि.... title=

मुंबई : खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांना काळानं रस्त्यातच गाठलं. दोन बसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

या बस अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बस जात असताना समोरून एक बस आली आणि धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. 

हा अपघात एवढा भयंकर होता की बस ड्रायव्हर जागेवरून उडून दुसरीकडे फेकला गेला. त्यावरून धडक किती जोरात बसली असेल याचा अंदाज येऊ शकतो. या अपघातात 30 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. 

हा भीषण अपघात तमिळनाडूतील सलेम परिसरात ही भीषण दुर्घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण समजू शकलं नाही.