जम्मू-काश्मिरात आता एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा

ब्लॅक कमांडो करणार दहशतवाद्यांचा खात्मा

Updated: Jun 22, 2018, 06:41 PM IST
जम्मू-काश्मिरात आता एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आता केंद्र सरकारनं एनएसजी कमांडोंची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच ब्लॅक कॅट कमांडोंचं पथक काश्मीरमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी दाखल होणार आहे. बुधवारीच राष्ट्रपतींनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यापाल राजवट लागू केली आहे. एनएसजी कमांडोंचं एक पथक नेहमीच राज्यात तैनात  असतं. पण स्थानिक पोलीस किंवा लष्कराच्या कारवायांमध्ये त्यांचा थेट सहभाग नसतो. गेल्या काही दिवसापासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी या कमांडोंना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच ते लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या बरोबरीनं दहशतवादविरोधी मोहिमेत सक्रिय होतील अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल सकाळी काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीर वाईज उमार फारुख, आणि यासिन मलिक यांना नजरकैदेत टाकण्यात आलं आहे. आज राज्यपाल एन एन व्होरा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आह. या बैठकी राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज काश्मीर पोलीसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या जवानांनी ISISच्या दहशतवाद्यांना कंठस्नानं घातलं. काल संध्याकाळी सुरू झालेली चकमक आज सकाळी आटोपली. चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचाही चकमकीत मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचलकांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर या दहशतवादी संघटनेसाठी कारवाया करत होते.