'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत. 

PTI | Updated: Jun 22, 2018, 06:21 PM IST
'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, दहशतवादी आणि सुरक्षाबल जवान यांच्यांत श्रीगुफवारा गावात जोरदार चकमक झाली. यात एक पोलीस कर्मचारी आणि एक सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ठाक केलेल्या एका दहशतवाद्याचे नाव दाऊद आहे. तो इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीरचा मोरक्या आहे. ही संघटा आयएसआयएसशी संबंधित आहे.

दहशतवादी आणि सुरक्षा दल जवान यांच्यात झालेल्या चकमकीत तीना सामान्य नागरिक जखमी झालेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, श्रीगुफवारामध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झालेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दहशवाद्यांसोबत सुरु असलेली चकमक संपली असून यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय.