मुंबई : PPF vs NPS vs SSY : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) च्या खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या कर-बचत योजनांमध्ये खातेधारकांना तुमचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी चालु आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करणे आवश्यक असते. म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या खात्यांचा बॅलेन्सचा अपडेट करावा लागेल.
तुम्ही वर्षभरात हे खाते तपासले नसतील तर आजच तपासा. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात या खात्यांमध्ये एकही पैसा जमा केला नसेल तर त्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत किमान आवश्यक रक्कम जमा करा. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. एकदा ही खाती निष्क्रिय केल्यानंतर, ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
तुम्ही चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी नवीन किंवा जुन्या कर प्रणालीची निवड केली असली तरीही, खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक किमान योगदान जमा करणे आवश्यक ठरते.
आर्थिक वर्षात PPF मध्ये किमान वार्षिक रक्कम 500 रुपये जमा करणे गरजेचे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत रक्कम जमा केली नसेल तर लवकरच करा. अन्यथा तुम्हाला प्रत्येक वर्षी 500 रुपयांच्या थकबाकीसह प्रत्येक वर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्यात कोणतेही कर्ज मिळणार नाही.
नियमांनुसार, Tier-I NPS खातेधारकांना एका आर्थिक वर्षात किमान 1,000 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. तसेच, NPS Tier-I खात्यामध्ये किमान रक्कम न भरल्यास, खाते निष्क्रिय होईल. यासाठी तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागेल.
सुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा यासाठी तुम्हाला 50 रुपये दंड आकारला जाईल. SSY खाते उघडल्याच्या तारखेपासून 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी डिफॉल्ट खाते नियमित केले जाऊ शकते. जर तुम्ही अद्याप या खात्यातील किमान रक्कम तपासली नसेल, तर आजच तपासा आणि अपडेट करा.