'आरबीआय'ने नाही तर 'आरएसएस'ने दिला 'नोटबंदी'चा सल्ला- राहुल गांधी

नोटबंदीचा सल्ला रिझर्व बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलायं.

Updated: Feb 13, 2018, 08:44 PM IST
'आरबीआय'ने नाही तर 'आरएसएस'ने दिला 'नोटबंदी'चा सल्ला- राहुल गांधी  title=

कलबुर्गी : पंतप्रधानांना नोटबंदीचा सल्ला रिझर्व बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलायं.

आरएसएसचा विचार 

 राहुल गांधींनी यासंदर्भात एक ट्विट केलयं. 'तुम्हाला माहितेय नोटबंदीचा विचार कुठून आला ? तुम्हाला माहितेय का नोटबंदीचा विचार पंतप्रधानांना कोणी दिला ?

आरबीआयने नाही, अरुण जेटलींनी (अर्थमंत्री) नाही तर आरएरएसच्या खास विचारकाने दिला आहे.' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अन्यायकारक निर्णय 

 आरएसएस पंतप्रधानांना सल्ला देतं आणि पंतप्रधान त्याच्यावर अंमल करतात. आरएसएस आणि भाजपाच्या काम करण्याची हिच पद्धत आहे.

आपल्याला सर्व माहितेय असं आरएसएसला वाटत मग अन्यायकारक निर्णय का घेतले जातात ? असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला. 

काळा पैसा पांढरा झाला 

पाचशे आणि हजारच्या नोटा नष्ट करण चांगला विचार नव्हता, यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना आपला काळा पैसा पांढरा करायची संधी मिळाली असंही राहुल यांनी सांगितले.