राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Updated: Apr 12, 2023, 03:28 PM IST
राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO title=

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : 2024 च्या रणनीतीसाठी विरोधकांची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, विद्यामान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यंत्री तेजस्वी यादव यांची महत्त्वाची बैठक झाली. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. ही विचारांची लढाई आहे आणि सगळे एकत्र येऊन ही लढाई लढू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत विरोधी एकजूट घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भेट घेतली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह नितीश कुमार खरगे यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी तिथे आधीच उपस्थित होते. यादरम्यान एक गोष्ट कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचे पाहायला मिळाले.

या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. नितीश कुमार तेजस्वी यादवसोबत खरगे यांच्या घरी पोहोचताच मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर राहुल गांधीही आतून बाहेर आले. यादरम्यान नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांना दाढी वाढवण्याचे कारण विचारले, त्यावर राहुल गांधी यांनी काहीतरी उत्तर दिले.

दरम्यान, नितीश कुमार आणि राहुल गांधी फोटोसाठी एकत्र उभे राहिले. त्याचवेळी तेजस्वी यादव हे दोघांच्या मागे उभे होते. ही बाब राहुल गांधी यांना खटकली. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा हात धरुन त्यांना पुढे ओढले आणि त्यांच्यासोबत उभे केले. ही संपूर्ण घटना व्हिडिओत चित्रित झाली आहे. 

काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूची बैठक

या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशिवाय जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारचे मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच खरगे यांनी नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि शिवसेना  पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर ही भेट झाल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

JDU नेते आणि मुख्यमंत्री नितीश यांनी याआधीच विरोधी ऐक्याचा सल्ला दिला आहे. नितीश यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक वेळा भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. फेब्रुवारीमध्येही ते म्हणाले होते की, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 2024 ची लोकसभा निवडणूक एकजुटीने लढल्यास भाजपच्या जागा 100 पेक्षा कमी होतील.