चीनच्या शिकारीचं जाळं; Google कडून ५ ऍप्सवर बंदी

ऑनलाईन व्यवहार करत असाल तर सावधान...  

Updated: Nov 18, 2020, 05:28 PM IST
चीनच्या शिकारीचं जाळं; Google कडून ५ ऍप्सवर बंदी  title=

मुंबई : सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पैशांचा व्यवहार करण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडतात. पण जर का तुम्ही लोन किंवा पैसे घेण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करत असाल तर सावधान. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी जर का तुम्ही गूगल प्ले स्टोरवरून(Google Play Store)आर्थिक व्यवहार करणारे ऍप डाऊनलोड केले असतील तर तुम्हाला सतर्क राहण्याची  गरज आहे. चिनी सर्वरद्वारे ऍप स्टोरमध्ये सामिल असलेल्या ५ ऍप्सवर गूगलने बंदी घातली आहे. हे सर्व ऍप्स बेकायदेशीर असून त्यांना शासनाने मान्यता दिली नाही.

TOIने दिलेल्या रिपोर्टनुसार गूगल प्ले स्टोरने k Cash, Go Cash, Flip Cash, ECash आणि  SnapltLoan हे ऍप बॅन केले आहेत. गुगलने असे म्हटले आहे की, कोणत्याही देशात संबंधित अॅप्स चालविण्यासाठी स्थानिक सरकारकडून मान्यता घेणे बंधनकारक आहे. हे पाच अ‍ॅप्स सरकारी परवानगीशिवाय गुगल ऍप स्टोअर वरून चालविली जात असल्यामुळे या ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या ऍप्सचा संबंध थेट चीनसोबत असल्याचा खुलासा देखील मिळालेल्या माहितीतून समोर आला आहे. अलिबाबा क्लाऊडच्या सर्व्हरवरून हे सर्व ऍप्स चालवण्यात येत होते. मात्र अद्यापही या ५ ऍप्सला ट्रेस करण्यात आलेलं नाही. 

त्यामुळे तुम्ही Ok Cash, Go Cash, Flip Cash, ECash आणि SnapltLoan यांपैकी कोणतेही ऍप डाऊनलोड केले असतील तर तात्काळ Uninstall  करा. आतापर्यंत हे ऍप्स १० लाख युजर्सने डाऊनलोड केले आहे.