Crime News In Marathi: लेकीकडून भाजीत मीठ (Salt) जास्त पडले या क्षुल्लक कारणावरुन जन्मदात्या पित्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी (Police) गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. (Crime News)
भाजीत मीठ कमी झाल्यामुळं चिडलेल्या वडिलांनी तिच्या छातीवर व कंबरेवर चाकुने हल्ला केला आहे. मुलीच्या किंकाळ्या ऐकून घर मालकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीची अवस्था नाजूक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आरोपींला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिल मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. तर, मुलांच्या आईचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळं सध्या घरात वडिलांसह एक मुलगा आणि एक मुलगी असे एकून तीन जण राहतात. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं पीडित अल्पवयीन मुलीचा जीव वाचला आहे. घर मालकाच्या म्हणण्यानुसार, वडिल सतत दारूच्या नशेत असतात. यापूर्वी त्यांच्याकडून असं कधी घडलं नव्हतं अचानक त्यांनी का असं केलं काहीच कळत नाही.
या प्रकरणी DSP अंबुजा त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली नगर येथील सर्वोदय नगरमध्ये राहणारा एक व्यक्ती हा मानसिक रुग्ण आहे. त्यानेच क्षुल्लक कारणावरुन त्याच्या मुलीवर चाकुने वार करत गंभीर जखमी केले आहे. पण शेजाऱ्यांनी मुलीचा आरडाओरडा ऐकून तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यामुळं तिचा जीव वाचला आहे. सदर अल्पवयीन मुलगी ही गंभिररित्या जखमी झाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.