Covid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार

Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Updated: Jan 7, 2022, 11:47 AM IST
Covid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार title=

मुंबई :  Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या (Covid-19 Latest Update) सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे 1 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्गाचा दर 7.74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, आठवड्याचा दर 4.54 टक्के आहे. देशात आतापर्यंत 68.68 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.(New cases of corona increased across the India, figure crossed 1 lakh in last 24 hours)

देशात कोरोनाचे अनेक सक्रिय रुग्ण  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 17 हजार 100 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 71 हजार 363 झाली आहे. ही संख्या भारतात आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी 1 टक्के आहे. भारतातील कोरोनामधून बरे होण्याचा दर 97.57 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत 30 हजार 836 बाधित लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत. 

लसीकरणात भारताने केला विक्रम

लसीकरणाच्याबाबतीत भारताने विक्रम केला आहे. 150 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याचा पराक्रम भारताने केला आहे. देशात आतापर्यंत 154.32 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. हा एक सौम्य आजार आहे. घाबरुन औषध साठवून ठेवू नका. रुग्णालयात तसे जाण्याची गरज नाही.

देशाच्या राजधानीबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे 15 हजारांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले गेले. गुरुवारी देशाच्या राजधानीत कोरोनाचे 15 हजार 97 नवीन रुग्ण आढळले. यादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर साडेबारा टक्क्यांहून अधिक आहे. दिल्लीत कोविड-19 मुळे मृतांची संख्या 25 हजार 127 वर पोहोचली आहे.