'सगळ्यात आधी त्याची बत्तीशी काढा', कोर्टाला का द्यावा लागला अजब निर्णय?

न्यायालयाने दिलेली शिक्षा सुन्न करणारी

Updated: Jan 7, 2022, 11:11 AM IST
'सगळ्यात आधी त्याची बत्तीशी काढा', कोर्टाला का द्यावा लागला अजब निर्णय? title=

मुंबई : लग्नानंतर पत्नीसोबत अमानुष कृत्य करणारी व्यक्ती ही हैवानच असू शकते. पत्नीला समान वागणूक न देता तिच्याकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहणं एका नवऱ्याला चांगलच महागात पडलं आहे. एक अजबच प्रकार न्यायालयासमोर आला आहे. आणि न्यायालयानेही यावर ठोठावलेली शिक्षा स्तब्ध करणारी आहे.

एका पतीने पत्नीवर अनैसर्गिक संबंध ठेवले. पती एवढ्यावरच थांबला नाही तर तो चक्क आपल्या खोट्या बत्तीशीने तिचा चावा घेत असे. ही अमानुष वागणूक अगदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पत्नी सहन करत होती. ही संपूर्ण घटना मध्यप्रदेशच्या इंदौरमधील आहे. या घटनेने सगळेच सुन्न झाले आहेत. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून अनैसर्गिक संबंध आणि खोट्या धारधार दातांचा चावा सहन करणारी महिला किती वेदना सहन करत होती. 

 न्यायालयाने बत्तीशी काढण्याचे दिले आदेश 

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायाधिशांनी दिलेला आदेश ऐकून सगळेच स्तब्ध झाले. या अमानुष वागणुकीवर न्यायालयाने पतीची खोटी बत्तीशी काढून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. 

खोट्या बत्तीशीने पत्नीला चावायचा 

महिलेचं लग्न गुजरातलमधील ६७ वर्षीय ज्वेलर्स मालकासोबत झालं होतं. महिला इंदौरची राहणारी असून लग्नानंतर ती गुजरातला पतीसोबत गेली. महत्वाची बाब म्हणजे पत्नी पतीपेक्षा तब्बल २७ वर्षांनी लहान होती. 

महिलेचं आणि तिच्या नवऱ्याचं असं हे दुसरं लग्न होतं. ६७ वर्षीय नवऱ्याच्या तोंडात दात नसल्यामुळे त्याने खोटी बत्तीशी लावली होती. आणि याच बत्तीशीने तो पत्नीचा चावा घेत असे. 

पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल 

खोटे दात महिलेच्या शरीरावर पती रोवत असे. पत्नी जेव्हा या गोष्टीला विरोध करायची तेव्हा पती तिला धमकी द्यायचा. माझ्याकडे खूप पैसा आहे आणि माझ्या खूप मोठ मोठ्या ओळखी आहेत. 

महिला कसं तरी करून डिसेंबर महिन्यात तेथून पळून आली. त्यानंतर महिलेने इंदौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २८ ऑक्टोबर रोजी या दोघांचं लग्न झालं होतं. आणि लग्नानंतरच तो पत्नीसोबत अमानुष गोष्ट करत होता. 

अत्याचाराचे फोटो आणि गंभीर जखम झाल्याची निशाण कोर्टात दाखवले 

पत्नीने पती विरोधात अनैसर्गिक संबंध ठेवण्याची तक्रार पोलिसात केली होती. संबंध ठेवताना पती तिच्या शरीराचा चावा घेत असेल. पत्नीकडून वकिल कृष्णा कुमार यांनी सगळे पुरावे कोर्टात दाखल केले आहेत. यामध्ये अत्याचाराचे फोटो आणि गंभीर जखमेची निशाण याचा समावेश आहे. 

न्यायालयाने या प्रकरणाकडे गंभीर्तेने पाहत पोलिसांना आरोपीची खोटी बत्तीशी घशातून काढून जप्त करण्याचे कठोर आदेश दिले आहे. ७ डिसेंबरपासून पती फरार आहे.