NDA ठरवणार कोण बनणार मुख्यमंत्री- नितीशकुमार

नितीश कुमार यांची विविध प्रश्नांवर उत्तरे

Updated: Nov 13, 2020, 09:59 AM IST
NDA ठरवणार कोण बनणार मुख्यमंत्री- नितीशकुमार title=

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी संध्याकाळी जनता दल युनायटेडच्या कार्यालयात माध्यमांना प्रथम भेटले. तत्पूर्वी, त्यांनी तेथील नवनिर्वाचित जेडीयू आमदार आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या बैठकीत बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण असतील याचा निर्णय घेतला जाईल. एनडीए नेत्यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. होय, हे निश्चित आहे की एनडीए जनादेशानुसार सरकार स्थापन करेल. शपथविधीची तारीख निश्चित केलेली नाही, असेही ते म्हणाले. निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी एनडीएमध्ये येणार की नाही. याबाबत भाजपने निर्णय घेणे आवश्यक असल्याचं देखील नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्याबाबत ते म्हणाले की, दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक आयोगाने आमदारांची यादीही दिली आहे. शुक्रवारी एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून पुढील निर्णय घेण्यात येईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन सरकार कधी शपथ घेईल हे अद्याप ठरलेले नाही. आम्ही निकालांचे विश्लेषण करीत आहोत. आता शुक्रवारी एनडीएतील सर्व घटक पक्षांची बैठक होणार आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षाच्या खासकरुन राष्ट्रीय जनता दलाच्या रोजगाराच्या आश्वासनाचा संदर्भ देताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, ज्या गोष्टी घडू शकत नाहीत त्याबद्दल लोकं बोलत होते. जनता मालक आहे. त्याने जे समजले त्यांनी केले. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत होतो. मी केलेल्या कामाची लोकांना जाणीव आहे. भारतीय जनता पक्षानेही 19 लाख रोजगारनिर्मिती करण्याबाबत बोलले असल्याचे मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर एनडीएतील सर्व घटकांच्या बैठकीत या कार्यक्रमाचा निर्णय घेण्यात येईल.

मुख्यमंत्री म्हणाले की आमच्यावर कुठलाही दबाव आला नाही. बरेच लोकं केलेल्या कामांवर देखील आपले समर्थन करत नसतील तर हा त्यांचा निर्णय आहे. प्रत्येकाला स्वत:च्या मार्गाने विचार करण्याचा अधिकार आहे. कामाकडे दुर्लक्ष केल्यास कोणी काय करू शकते?

मुख्यमंत्री म्हणाले की, 'त्यांचे सरकार समाजात भेदभाव करत नाही. बंधुता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. कायदा व सुव्यवस्था कायम राखली गेली. तेथे कोणतीही दंगल झाली नाही. सरकार यापुढेही गुन्हे, भ्रष्टाचार आणि जातीयवादावर तडजोड करणार नाही.'

मुख्यमंत्र्यांना असेही विचारले गेले होते की, एलजेपीमुळे झालेल्या नुकसानीनंतर ते एनडीएचा भाग राहू नये म्हणून याबाबत प्रयत्न केले जातील का? मुख्यमंत्री म्हणाले की, 'भाजपने हा निर्णय घ्यायचा आहे.'