जया बच्चन यांच्यावरील वादग्रस्त विधानाबाबत नरेश अग्रवालांची दिलगिरी!

भाजप नेते नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्ती केलीये. समाजवादी पार्टी सोडत भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. 

Amit Ingole Updated: Mar 13, 2018, 11:30 AM IST
जया बच्चन यांच्यावरील वादग्रस्त विधानाबाबत नरेश अग्रवालांची दिलगिरी! title=

नवी दिल्ली : भाजप नेते नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्ती केलीये. समाजवादी पार्टी सोडत भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. 

काय म्हणाले अग्रवाल?

प्रसारमाध्यमांशी बोलताना अग्रवाल म्हणाले की, ‘जर माझ्या काही बोलण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो’. या वक्तव्यावरून अग्रवाल यांच्यावर विविध पक्षातील महिला नेत्यांनीही टीका केली होती. 

काय म्हणाले होते अग्रवाल?

ते म्हणाले होते की, ‘सपामध्ये त्यांची तुलना सिनेमात नाचणा-या आणि काम करणा-या लोकांशी केली गेली. त्यांच्यामुळे माझं तिकीट कापलं गेलं. मला हे योग्य वाटत नाही’.

सुषमा स्वराज यांनीही केली टीका

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही अग्रवाल यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, नरेश अग्रवाल आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांचं स्वागत. पण त्यांनी जया बच्चन यांच्यावर केलेलं वक्तव्य चुकीचं आहे’.

यामुळे नरेश अग्रवाल नाराज

नरेश अग्रवाल हे राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा सदस्य म्हणून नरेश अग्रवाल यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. सपामध्ये अखिलेश विरूद्ध मुलायम असा वाद सुरू होता तेव्हा नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यांना समर्थन दिलं होतं. त्यानंतरही पक्षाने जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि नरेश अग्रवाल यांचा पत्ता कट केलाय.