पटना : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव यांनी बिहारमधील नवादातील हिसुआमध्ये निवडणूक रॅली केली. यावेळी त्यांनी चीनसोबत लढताना शहीद झालेल्या बिहारचे सैनिक आणि नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. रोजगारसंदर्भात पंतप्रधान मोदी खोट बोलल्याचा आरोप त्यांनी केलाय.
चीनसोबतच्या वादात बिहारचे तरुण सैनिक शहीद झाले त्यावेळी पंतप्रधानांनी काय म्हटले आणि काय केले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चीनी सैनिकांनी आपले २० सैनिकांना शहीद केले आणि आपल्या १२०० किलोमीटर जमीनीवर ताबा मिळवला. पण हिंदुस्थानाच्या हद्दीत कोणी आलेच नसल्याचे म्हणत पंतप्रधानांनी सैनिकांचा अपमान केला. शहीदांसमोर माथा झुकवतो असे ते आज म्हणतात. पण चीन भारतातील ताबा कधी सोडणार आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी मजुरांची काही मदत केली नाही. त्यांनी गरजेच्यावेळी प्रवाशांना कोणती मदत केली नाही. बिहारच्या लोकांसमोर आता सत्य आले आहे. त्यामुळे ते आता नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीश कुमार यांना देखील उत्तर देतील.
पंतप्रधानांनी बिहारच्या जनतेशी खोट बोलू नये. तुम्ही किती रोजगार दिला हे बिहारला सांगा असे ते म्हणाले. मागच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. तुम्हाला रोजगार मिळाला का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.