Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोलले

Waqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2024, 04:48 PM IST
Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोलले title=

Waqf Bill: लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सार केलं आहे. विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस, समाजवादी पक्षासह इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. दुसरीकडे मध्य प्रदेशच्या मुस्लीम वक्फ बोर्डाचे चेअरमन सनवर पटेल यांनी या विधेयकाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, मुस्लिम वक्फ बोर्ड विधेयक हे राष्ट्र, जनता आणि वक्फ संस्थेच्या हिताचे आहे. राज्यातील वक्फ बोर्डाच्या टक्के जमिनीवर गुंड, बदमाश आणि समाजकंटकांचा कब्जा आहे असंही त्यांनी स्पष्टच सांगितलं. 

जेव्हा हे विधेयक मांडण्यात आलं तेव्हा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल म्हणाले की, "मी या विधेयकाचं स्वागत करतो. जी नवी आव्हानं असतात त्यावर योग्य प्रकारे मात करण्यासाठी नवीन कायदे आणि नवीन सुधारणा आवश्यक आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यावेळच्या परिस्थितीनुसार सुधारणा केल्या जातील असं नमूद केलं आहे. ही दुरुस्ती सुधारणेसाठी आहे, त्याचा फायदा जनतेला होतो, मग त्याचे स्वागत का होऊ नये. ही दुरुस्ती राष्ट्रहितासाठी, राष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी आणि त्या काळातील संस्थेच्या हितासाठी आहे.

मध्य प्रदेशात 16,990 मालमत्ता

पुढे ते म्हणाले की, मध्य प्रदेशात 16,990 मालमत्ता आहेत पण आमचे उत्पन्न काय? आम्हाला अनुदानावर अवलंबून राहावे लागते. पगार वेळेवर येईल की नाही? त्याचे वितरण होईल का? लाईट बिल भरता येईल की नाही? पगार वेळेवर वाटून किंवा वीज बिल वेळेवर भरता येत नाही? यासारख्या चिंता सतावतात म्हणजे काहीतरी कमतरता असावी. एवढी प्रचंड संपत्ती असूनही, ज्या कारणासाठी देणगीदारांनी मालमत्ता दिल्या होत्या त्या दानधर्मासाठी आपण देऊ शकत नसाल, तर मला वाटते कायद्यात दुरुस्तीची गरज आहे आणि या दुरुस्तीद्वारे तथाकथित गुंडांना आणि समाजकंटकांवर अंकुश ठेवला जाईल आणि लोककल्याणकारी आणि धर्मादाय कामांवर खर्च करू शकू.

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर कब्जा

पटेल पुढे म्हणाले की, राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे 16,990 मालमत्ता आहेत, त्यापैकी सुमारे 5971 हेक्टर शेतजमीन आहे. आता ज्याच्याकडे इतकी जमीन आहे त्याचे उत्पन्न शून्य असावे का? आम्ही येण्यापूर्वी उत्पन्न शून्य होतं, ते शून्य कसं असेल? कुठेतरी कमतरता आहे का? असे जे लोक आज निषेधाची भाषा बोलत आहेत, तेच लोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे तेव्हा व्यवस्थापनाचा ताबा होता. हे लोक एक रुपयाही येऊ देत नव्हते. पैसाच येणार नाही आणि उत्पन्नही मिळणार नाही, तर जे खर्च करायचे ते कसे खर्च करणार? या विधेयकामुळे अशा लोकांना आळा बसेल. भारत सरकारला सर्वांचे सहकार्य, सर्वांचा विकास हवा आहे. भारत सरकार जे काही करत आहे, त्यामुळे बोर्डाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढेल आणि समाजाचे कल्याणही होईल.

ते म्हणाले की, आमच्याच समाजातील 99 टक्के लोकांनी तेथील असामाजिक तत्वांचा ताबा घेतला आहे. आज जर कोणी सुधारणांसाठी येत असेल तर त्यांनाच सर्वात जास्त पोटदुखी होत आहे. कारण त्यांना नवीन कायदा अधिक मजबूत होईल अशी भीती वाटते. आपले भारत सरकार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान आहेत, ज्यांनी कठोर कायदा आणला आहे जो अशा लोकांवर अंकुश लावेल.