'राज्यातील मुस्लिमांनी भगवा खांद्यावर घ्यावा'

आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचं भांडण पाकिस्तानसोबत आहे.

Updated: Oct 13, 2019, 03:06 PM IST
'राज्यातील मुस्लिमांनी भगवा खांद्यावर घ्यावा' title=

औरंगाबाद: महाराष्ट्रातील मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवावा आणि भगवा खांद्यावर घ्यावा, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच प्रवेश केला होता. यानंतर त्यांना औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.

हिंमत असेल तर ३७० पुन्हा आणून दाखवा- मोदी

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचं भांडण पाकिस्तानसोबत आहे. आपण इथं भांडत बसू नये, तर एकत्र राहून पाकड्यांना नामोहरम करू. आज सत्तार आले, उद्या सत्ता येईल. आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. समोर कुणीही असलं तरी अब्दुल सत्तार वाघ आहेत आणि ते जिंकणारच. सत्तार यांच्या विरोधात सर्वांनी मिळून एक उमेदवार दिला आहे. मात्र, वाघ हा एकटाच लढून जिंकत असतो. त्यामुळे अब्दुलभाईंनी चिंता करू नये, आपण नक्की जिंकू, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. 

खरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस