मुंबई : SEL Manufacturing Company Multibagger Share : शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणं सोपं नसतं. उत्तम परतावा मिळवण्यासाठी योग्य स्टॉकची निवड आवश्यक असते. 2021 मध्ये अनेक पेनीस्टॉकने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगत आहोत. या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. तुम्ही अद्यापही यामध्ये यामध्ये गुंतवणूक करू शकता. बाजारात घसरण होत असली तरी हा शेअर सातत्याने वाढला आहे. एवढेच नाही तर या शेअरने अवघ्या एका महिन्यात सुमारे 300 टक्के परतावा दिला आहे.
हा शेअर म्हणजे SEL Manufacturing Company होय. या कंपनीच्या शेअरने गेल्या काही महिन्यांत तेजीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. एखाद्या गुंतवणूकदारांने ऑक्टोबर 2022 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे शेअर्स आज 3 कोटींहून अधिक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा शेअरने मोठी तेजी नोंदवली आहे.
28 ऑक्टोबर 2021 रोजी, शेअरची किंमत NSE वर 4.95 रुपये होती. तर 21 एप्रिलरोजी हा शेअर 1548.20 च्या किमती ट्रेड करीत आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने 30 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.