Radhika Merchant becomes Aunty : देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात वाखाणण्याजोगं यश मिळवल्यानंतर मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कामाचा भार हळुहळू मुलांवर सोपवण्यास सुरुवात केली. (Akash, Isha, anant ambani) आकाश, ईशा आणि अनंत या तिघांनीही वडिलांना अपेक्षित साथ देण्यासाठी या क्षेत्रात सक्रीय सहभाग घेतला. अशा या अंबानी कुटुंबात उद्योगातील यशासोबतच एक नवी गोड बातमी असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा, अनंत अंबानी याची होणारी पत्नी आणि अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट ही सध्या या आनंदाच्या बातमीमुळं प्रचंड आनंदात आहे. कारण, तिची बहीण अंजली मर्चंट (Rahika Merchant sister anjali) आई होणार आहे. DryFix ची सहसंस्थापक आणि एक यशस्वी उद्योजिका अशी ओळख असणाऱ्या अंजलीच्या आयुष्यातील हे वळण सध्या मर्चंट आणि अंबानी कुटुंबालाही आनंद देणारं ठरत आहे. कारण, त्यांच्या व्याह्यांच्या कुटुंबामध्ये सर्वत्र आनंदाचंच वातावरण पाहायला मिळत आहे.
नुकतंच राधिकाचं बेबी शॉवर (Baby Shower) पार पडलं. यावेळी ती अत्यंत कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिच्या मागे असणारी सजावट पाहता हा बेबी शॉवरचा सोहळा अत्यंत छोटेखानी होता हेच सिद्ध होत आहे. रंगीबेरंगी फुगे आणि 'Oh Baby'चा बॅनर अशी सजावट तिथे केली होती.
राधिका आणि अंजलीचं खास नातं...
राधिका आणि अंजली मर्चंट या एकमेकिंच्या अगदी जवळ आहेत. अंजलीच्या लग्नातही राधिकानं खास जबाबदारी निभावली होती. त्या क्षणी या बहिणींमध्ये असणारं नातं सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन गेलं.
एनकोअर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष वीरेन मर्चंट यांची ही लेक. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल, École Mondiale World School येथून तिनं शिक्षण घेतलं. IB Diploma साठी ती BD Somani International School मध्ये गेली. न्यूयॉर्क विद्यापीठातून तिनं Politics , Economics या विषयांमध्ये पदवी शिक्षण घेतलं. भारतात परतल्यानंतर तिनं Isprava या रिअल इस्टेट कंपनीमध्ये सेल्स एक्झेक्युटीव्ह म्हणून कामाची सुरुवात केली.