शहडोल : गेल्यानंतरही मृतदेहासोबत उपेक्षाच झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णालयानं रुग्णवाहिका नाकारली. तर खासगी रुग्णवाहिकेसाठी 5 हजार रुपये मागण्यात आले. आईच्या उपचारासाठी सगळे पैसे गेले. पैशांची चणचण असलेल्या मुलानं अखेर आईचा मृतदेह हृदयाशी कवटाळला आणि बाईकवरून घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील शहडोल इथली भीषण परिस्थिती दाखवणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर मुलगा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णावहिका न मिळाल्याने आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून 80 किलोमीटर घेऊन जातो. खिशात 5 हजार रुपये नसल्याने हताश झालेल्या मुलाने अखेर मृतदेह बाईकवरून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
जयमंत्री यादव यांना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान 2.40 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. तर खासगी रुग्णवाहिकेसाठी जास्त पैसे सांगितले जात होते. त्यामुळे अखेर मुलावर अशी वेळ आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेश: शहडोल के शासकीय अस्पताल और मेडिकल कॉलेज में शव वाहन नहीं मिला. प्राइवेट शव वाहन वाले ने 5 हजार रुपए मांगे. इतने पैसे नहीं थे तो लाचार बेटा मां के शव को मोटरसाइकिल पर बांधकर 80 किलोमीटर दूर ले जाने को मजबूर हो गया. #MadhyaPradesh @ChouhanShivraj pic.twitter.com/his2a9IMqs
— Nitesh Ojha (@niteshojha786) August 1, 2022