ऑनलाइन गेमिंगच्या नादात मुलाने आईच्या खात्यातील 36 लाख उडवले; संपूर्ण कुटूंब उद्धवस्त

 हैदराबाद येथील एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाइन गेमिंगमुळे आईच्या बँक खात्यातील 36 लाख रुपयांचा चुराडा केल्याची धक्कादायक घटना घडली.

Updated: Jun 6, 2022, 10:30 AM IST
ऑनलाइन गेमिंगच्या नादात मुलाने आईच्या खात्यातील 36 लाख उडवले; संपूर्ण कुटूंब उद्धवस्त  title=

हैद्राबाद : हैदराबाद येथील एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाइन गेमिंगमुळे आईच्या बँक खात्यातील 36 लाख रुपयांचा चुराडा केल्याची धक्कादायक घटना घडली.  हैदराबादच्या अंबरपेट भागातील रहिवासी असलेल्या या मुलाने ऑनलाइन गेमसाठी पैसे देण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्यांचा वापर केला.

गेमिंग व्यसनात पैशाचा अपव्यय

हैदराबाद पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचच्या माहितीनुसार, मुलाने आजोबांच्या मोबाईलवर फ्री फायर गेमिंग अॅप डाउनलोड केले. गेम खेळण्यासाठी त्याने सुरुवातीला 1,500 रुपये आणि नंतर 10,000 रुपये आईच्या बँक खात्यातून वापरले.

त्याला खेळाचे व्यसन लागताच घरातील सदस्यांच्या नकळत त्याने मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यास सुरुवात केली.

आईच्या बँक खात्यातून 36 लाख उडवले

हा मुलगा इयत्ता 11वीचा विद्यार्थी असून त्याने 1.45 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च करीत राहिला. 

त्याची आई पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये गेली असता, खात्यात पैसेच शिल्लक नसल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला. खात्यातून एकूण 27 लाख रुपये खर्च झाले होते.

त्यानंतर त्यांनी एचडीएफसी बँकेतील खाते तपासले असता नऊ लाख रुपये गायब झाल्याचे आढळून आले. महिलेने सायबर क्राईम पोलीस ठाणे गाठले. 

हा पैसा तिच्या दिवंगत पतीने कष्टाने कमावल्याचे तिने पोलिसांना सांगितले.  पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला या पैशांचा मोठा आधार होता. परंतू आता संपूर्ण कुटूंब ऑनलाइन गेमिंगमुळे उद्धवस्त झाले