एकमेकांच्या प्रेमात सासू आणि जावई; नऊ महिन्यांनंतर उचललं मोठं पाऊल

मुलीच्या लग्नाला झाले होते काही दिवस;  आईने केला असा प्रताप 

Updated: Aug 8, 2021, 09:14 AM IST
एकमेकांच्या प्रेमात सासू आणि जावई; नऊ महिन्यांनंतर उचललं मोठं पाऊल  title=

नवी दिल्ली : प्रेमाला कोणतीचं बंधन नसतात. प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी प्रत्येक जोडप्याची असते. पण काही घटना अशा असतात ज्यामुळे सगळ्यांनाचं मोठा धक्का बसतो. प्रेमाच्या या अनोख्या प्रकरणात असे 2 जण प्रेमाण अडकले, ज्या नात्याला आई आणि मुलाचा दर्जा दिला 
जातो. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये 50 वर्षाची सासू स्वतःच्या 25 वर्षांच्या जावयाच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर त्यांनी प्रेमासाठी मोठं पाऊल देखील उचललं.

ऐरवी मुलगा आणि मुलगी घरच्यांच्या विरोधात जावून लग्न करतता. पण याठिकाणी तर सासू आणि जायवयाने एकत्र येण्यासाठी पळून जाण्याचा निर्णय घेतला.  सासू आणि जावई पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. दरम्यान, एका भौराकल क्षेत्रातील गावात एका महिलेने मुलीचं लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर तिला जावयासोबत प्रेम झालं. 

त्यानंतर महिला जावयाला घेवून पळून गेली. पळून गेल्यानंतर 10 महिन्यांनंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न करून पुन्हा घरी परतले. जेव्हा नातेवाईकांना दोघांना लग्नबद्दल कळालं तेव्हा एकचं खळबळ माजली. हे प्रकरण पोलीसांपर्यंत पोहोचलं. पण दोघांनीही आम्ही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो आणि आम्हाला एकत्र राहायचं आहे. असं त्यांनी सांगितलं. 

नातेवाईकांदेखील त्यांच्या प्रेमासमोर हार मानावी लागली. आता दोन्ही कुटुंबाने त्यांच्यासोबत असलेलं नात तोडलं आहे. पण आता दोघेही आनंदी आहेत. सध्या हे प्रकरण गावात चर्चेत आहे.