1 जूनला केरळमध्ये हजेरी लावणार मान्सून, यावर्षी किती पाऊस पडेल हे जाणून घ्या

भारतीय हवामान खात्याने चार महिने म्हणजेच  जून - जुलै - ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

Updated: May 6, 2021, 10:52 PM IST
1 जूनला केरळमध्ये हजेरी लावणार मान्सून, यावर्षी किती पाऊस पडेल हे जाणून घ्या title=

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हण्यानुसार 1 जूनला मान्सून  केरळमध्ये हजेरी लवू शकतो. भारतीय हवामान खात्याने चार महिने म्हणजेच  जून - जुलै - ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा नैऋत्य मॉन्सून 98 टक्के राहील, असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने 15 मे ला पाऊस पडण्याचा पुढील अंदाज वर्तवला आहे.

शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी

अहवालानुसार, भारतातील सुमारे 20 कोटी शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यांसारख्या अनेक पिकांची पेरणी करण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा करत असतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील जवळपास 50 टक्के शेतीतील जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या मान्सूनवर अवलंबून रहावे लागते.

1951 ते 2020 दरम्यान सुमारे 14 वेळा ला निनाला पाहिले गेले. यानंतर, फक्त दोनदा एल निनो आला आहे. देशातील बर्‍याच भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याचे मत

भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक्टेंडेंट रेंज फोरकास्टमध्ये (आयएमडी दर गुरुवारी ईआरएफ जाहीर करते, ज्यामध्ये पुढील चार आठवड्यांसाठी हवामानाचा अंदाज वर्तविला जातो) असे म्हटले आहे की, यावर्षी मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून केरळमध्ये मान्सून सुरू होऊ शकतो.

देशाच्या बहुतेक भागात सामान्य पावसाचा अंदाज आहे. नैऋत्य मॉन्सूनमुळे देशात सुमारे 75 टक्के पाऊस पडतो. देशाच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी ओडिशा, झारखंड, बिहार, आसाम आणि मेघालयात पाऊस कमी पडू शकतो.

'ला निना' म्हणजे काय?

हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, ला निनाला ईएनएसओ चा कोल्ड फेज म्हणतात. त्याच वेळी, एल निनोला ईएनएसओ चा हॉट फेज म्हणतात. ला निना आणि एल निनो दोघेही पॅसिफिक महासागरावरील पृष्ठभागाच्या तपमानात सामान्य बदल दर्शवितात. ला निना आणि एल निनो सहसा 9 ते 12 महिने टिकतात. त्यांची वारंवारता अनियमित असते आणि ते दर दोन ते सात वर्षांनी येतात.

ला निनामध्ये, हवा प्रशांत महासागराच्या उबदार पाण्याला, पश्चिमेकडील समुद्राच्या पृष्ठभागावर म्हणजेच दक्षिण अमेरिका ते इंडोनेशिया पर्यंत वाहून जाते. जेव्हा गरम पाणी पुढे सरकते तेव्हा थंड पाणी पृष्ठभागावर येते ज्यामुळे पूर्व पॅसिफिकमध्ये पाणी सामान्यपेक्षा थंड होते.

हवामानानुसार ला निना वर्षात, हिवाळ्यात वारे जास्त वेगाने फिरतात, ज्यामुळे लँडलाईनजवळील पाणी सामान्यपेक्षा काही अंशांवर थंड होते. समुद्राच्या तपमानात होणारे हे बदल जगातील हवामानावर परिणाम करतात. ला निनाचा परिणाम म्हणून, भारतात पावसाळ्यात जोरदार किंवा चांगला पाऊस पडतो.