तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप

काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 17, 2018, 08:26 PM IST
तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप title=

नवी दिल्ली : भाजपने महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपला अडचणीत आणण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, भाजपने आधी तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असे सांगत महिला आरक्षण विधेयक मंजूर करतो, असा प्रस्ताव काँग्रेसला भाजपने दिलाय. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेय.

राज्यसभेत अडकलेल्या तिहेरी तलाक विधेयकाला काँग्रेसने पाठींबा दिल्यास आम्ही महिला आरक्षण विधेयकाबाबत पावसाळी अधिवेशनात विचार करु, असे कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसला भाजपने कोंडीत पकडले आहे. प्रसाद यांनी पत्रात म्हटलेय, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या काळात का मंजूर करण्यात आले नाही. महिला आरक्षण विधेयकाबरोबरच तीन तलाक आणि हलाला विधेयकही मंजूर व्हायला हवे. आपल्या पत्रात प्रसाद यांनी याला नवी डील असे संबोधले आहे. 

नव्या डीलनुसार, आपल्याला महिला आरक्षण विधेयक, तीन तलाक विरोधी विधेयक आणि हलाला निकाल विधेयकही दोन्ही सभागृहात मंजूर करायला हवेत. तसेच सरकारला हे देखील जाणून घ्यायचे आहे की, आपल्या पक्षासह अन्य सहकारी पक्ष आणि इतर विरोधी पक्ष या विधेयकांवर समर्थन देईल का? तसेच संसदेचे कामकाज रोखणार नाहीत. राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. यामध्ये त्यांनी अनेक वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयकावर आगामी पावसाळी अधिवेशनात चर्चा करुन मंजूर करण्याची मागणी केली होती. 

यासाठी आपला विनाअट पाठिंबा असल्याचेही त्यांनी यात म्हटले होते. त्यानंतर भाजपकडून जोरदार गुगली टाकण्यात आलेय. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार किंवा काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलेय.