MiG 29K लढाऊ विमानाचा अपघात; धक्कादायक कारण समोर

तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं असल्याची माहिती आहे.

Updated: Oct 12, 2022, 11:53 AM IST
MiG 29K लढाऊ विमानाचा अपघात; धक्कादायक कारण समोर title=

गोवा : गोव्याच्या समुद्रामध्ये एक लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाने याबाबत माहिती दिली आहे. MiG 29K असं हे लढाऊ विमान असून तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं असल्याची माहिती आहे.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेट पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. पायलटची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही देण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी Board of Inquiry (BoI) यांना आदेश देण्यात आले आहेत.