MHT CET Answer Key 2022 : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रेंस टेस्ट (MHT CET 2022) परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर रोजी किंवा त्याआधी जाहीर होणार आहे.
स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल (CET CELL), महाराष्ट्राने PCM आणि PCB (PCB) या दोन्ही गटांसाठी MHT CET 2022 (MHT CET Answer Key 2022) आंसर- की जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- cetcell.mahacet.org वरून MHT CET 2022 आंसर- की तपासू आणि डाउनलोड करू शकतात. सीईटी सेल (CET CELL ) ने आंसर- की तसेच प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांची रिस्पांस शीट वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. आन्सर की पाहण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना लॉगिन करण्याकरिता अॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख आदी तपशील द्यावे लागणार आहेत.
वाचा: सीईटी 2022 शी संबंधित सर्वात मोठी बातमी
उमेदवार 4 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत MHT CET 2022 आंसर- की वर आक्षेप नोंदवू शकतात. MHT CET 2022 अंतिम आंसर-की CET सेलने MHT CET 2022 आंसर-की वर घेतलेल्या सर्व आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान MHT CET 2022 चा अंतिम निकाल 15 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.
MHT CET Answer Key 2022: अशी डाउनलोड करा आंसर-की
- सर्वप्रथम CET Cell च्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या
- त्यानंतर होमपेजवर एमएसटी सीईटी आंसर-की 2022 लिंकवर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन तपशील कळवा आणि सबमिट करा
- आंसर-की पहा आणि डाउनलोड करा
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या