नवी दिल्ली : सरकारी रुग्णालयात एका युवकाला गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमरुल असं या युवकाचं नाव आहे. रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये ही घटना घडली आहे. या भागात जुगार सुरु होता. यादरम्यानच पैशांवरुन वाद झाल्याने हा प्रकार घडला आहे. दिल्लीमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं हे रुग्णालय आहे.
गुरु गोविंद सिंह रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडल्यानंतर रुग्णांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. युवकाने पैसे हिसकावल्यामुळे हा वाद झाला. गोळी लागल्यानंतर मित्रांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं पण त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डीसीपी विजय कुमार यांनी मात्र जुगार सुरु असल्याचं अमान्य केलं आहे. प्रत्यक्षदर्शींचा जवाब नोंदवला गेला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.