लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशनानंतरही डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना थांबविण्याचे नावच नाही. बदायू जिल्ह्यात नवा प्रकार पुढे आलाय. चक्क आंबेडकरांच्या मूर्तीला भागवा रंग देण्याचा प्रयत्न झालाय. कुंवरगावजवळच्या दुगरैय्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याजागी नवा पुतळा बसवण्यात आलाय. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या कोटाला भगवा रंग देण्यात आला आहे.
नेहमी निळ्या रंगात दिसणारा डॉ. आंबेडकरांचा पुतळा उत्तर प्रदेशात मात्र पहिल्यांदाच भगव्या रंगात दिसत आहे. हा पुतळा कोणी उभारलाय, याचीच जास्त चर्चा होत आहे. मात्र, या पुतळ्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यातील कुंवरगावजवळच्या दुगरैय्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याजागी नवा पुतळा बसवण्यात आलाय. बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या कोटाला भगवा रंग देण्यात आलाय. पुतळ्याच्या विटंबनाआधी हा पुतळा निळ्या रंगात होता.
Badaun: A BR Ambedkar statue which was vandalized recently has been rebuilt and painted saffron in colour pic.twitter.com/saW7U9BBUi
— ANI UP (@ANINewsUP) April 10, 2018
डॉ. आंबेडकरांच्या नावात वडिलांच्या नावाचा म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर, असे संपूर्ण नाव असण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांच्या नावात वडिलांचे 'रामजी' हे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. वडिलांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या काळात आणखी एक प्रकार समोर आला आहे. आता मात्र पुतळ्याच्या कोटाला भगवा रंग देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात काही समाजकंटकांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. त्यानंतर या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते.
नवीन पुतळ्याचं अनावरण रविवारी पोलीस आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुतळा आहे त्याच जागी नव्यानं बसवण्यात आला. परंतु, पुतळ्याचा रंग निळ्याऐवजी भगव्या रंगात आहे. याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. उलट ग्रामस्थांनी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला हार घालून फोटो काढले. आता बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर निळ्या ऐवजी भगवा रंग चढवल्यामुळे एकच चर्चा सुरु आहे.