बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य

मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 26, 2018, 10:29 AM IST
बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य title=

बस्ती : मानवी मनात इतकी क्रुरता का निर्माण व्हावी, याचा नव्याने शोध घ्यावा अशी धक्कादायक घटना पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील या घटनेने अनेकांच्या अंगावर शहारे उभे केले आहेत. येथील एका क्रूर मुलाने आपल्या वडिलांचा गळा चिरला. मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि वडिलांचा गळा फेविक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश न आल्याने घाबरून जाऊन त्याने घराचा दरवाजा बंद करून पळ काढला.

वडील सेवानिवृत्त रल्वे कर्मचारी

घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे. येथील सोनहा पोलीस ठाणे हद्दीतील जंगल टोला येथील भसहवा येथे रामदेव मिश्र (वय ६५ वर्षे) यांचे घर आहे. रामदेव रल्वेसेवेतून निवृत्त झाले आहे. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ते आपला मुलगा जगदीश, सून आणि दोन नातवंडांसोबत राहतात.

फेविक्विकने गळा चिटकवण्याचा प्रयत्न

दरम्यान, रामदेव शनिवरी झोपले असताना जगदीशने त्यांचा गळा कापला. मात्र, या प्रकारानंतर होत असलेला रस्कस्त्राव, वडीलांची तडफड आणि त्यांचे विव्हळणे ऐकून जगदीश पुरता भांबावून गेला. या भरात त्याने फेविक्विकच्या सहाय्याने वडिलांचा गळा जोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आले नाही. वेदनेमुळे रामदेव यांचे विव्हळणने वाढतच होते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगदीशने टीव्हीचा आवाज मोठा केला. पण, प्रयत्न करूनही फेविक्विकने गळा जोडला जात नसल्याचे पाहून जगदीशने घर बंद केले आणि तेथून पळ काढला.

शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती

असहायतेने गलितगात्र झालेल्या रामदेवच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी कानोसा घेतला असता काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळावर हजेरी लावली.

आरोपी सराईत

दरम्यान, पोलिसांनी जगदीश विरोदात गुन्हा दाखल केला आहे. पण, धक्कादायक असे की, जगदीश हा बेरोजगार असून, त्याने या आधी त्याच्या पहिल्या पत्नीची छतावरून ढकलून देऊन हत्या केली होती. या प्रकरपणात त्याला सजाही झाली होती. या नव्या गुन्हाबाबत पोलीस त्याच्या मागावर असून, सध्या तो फरार आहे.