पतीला कसं ठेवायचं ताब्यात? विवाहित महिला काय काय Google सर्च करतात, जाणून घ्या

गुगल एक असं सर्च इंजिन आहे की, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं इथे उत्तर सापडतं. 

Updated: Sep 1, 2022, 07:36 PM IST
पतीला कसं ठेवायचं ताब्यात? विवाहित महिला काय काय Google सर्च करतात, जाणून घ्या title=

Married Women Most Google Searches:  गुगल एक असं सर्च इंजिन आहे की, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं इथे उत्तर सापडतं. त्यामुळे एखादी अडचण आली की पहिल्यांदा गुगलकडे धाव घेतली जाते. त्यामुळे सर्च इंजिनला गुगल गुरु म्हंटलं जातं. गुगल असलं की टेन्शन नसतं. गुगलवर एखादी गोष्ट शोधल्यानंतर सर्च हिस्ट्री डिलीट करता येतं. पण कुठे ना कुठे हिस्ट्री सेव्ह असते. त्यामुळे गुगल सर्वाधिक सर्च होणाऱ्या गोष्टी कालांतराने समोर येत असतात. विवाहित महिला गुगलवर सर्च करत असलेली बाब वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर जाणून घेऊयात विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात?

गुगलच्या आकडेवारीनुसार, विवाहित महिला आपल्या पतीला आपल्या ताब्यात कसे ठेवायचे, त्याला 'बायकोच्या ताटाखालचं मांजर' कसे बनवायचे याबद्दल सर्वाधिक सर्च करतात. पतीला काय आवडते, त्यांची निवड काय आणि काय आवडत नाही हेही तिला शोधतात. त्याचबरोबर आपल्या पतीचे मन कसे जिंकू शकतात? हा प्रश्नही विवाहित महिला गुगल गुरूला विचारतात. त्याचबरोबर त्यांना कसे आनंदित ठेवायचं? हे देखील विचारतात. तसेच कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधी घ्यावा आणि बाळ होण्याची योग्य वेळ कोणती? याबाबतही सर्च करतात.

विवाहित महिला सुखी संसारासाठीही गुगलची मदत घेतात. लग्नानंतर विवाहित महिला नवीन कुटुंबासोबत कसे वागावे, सासरच्या आनंदी कसे ठेवावे? याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. तसेच लग्नानंतर काम करणाऱ्या स्त्रिया गुगलला विचारतात की, लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा करावा? कौटुंबिक व्यवसाय असेल तर तो कसा हाताळावा? याबाबत विचारतात.