Crime News : अनैतिक संबंध किती धोकादायक ठरु शकतात. याची अनेक उदाहरणं याआधी ही पुढे आली आहेत. नवलपूर येथील एका घटनेने सर्वांनाच झटका बसला आहे. 30 वर्षीय विवाहितेची तिच्या प्रियकरानेच हत्या केली. गरजा आणि सतत पैशांची मागणी याला कंटाळून प्रियकराने तिला आधी बिअर पाजली आणि नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीये.
शेजारी राहणाऱ्या युवाकाने महिलेची हत्या केलीये. आरोपी रिक्षाचालक होता. सासर कडील लोकांसोबत भांडण झाल्याने ती मामाकडे रहायला आली होती. नंतर तिची शेजारच्या व्यक्तीसोबत जवळीक वाढली. ऑटोतून मिळणारी कमाई तो तिच्यावर खर्च करत असे. काही दिवसांपूर्वी तिने बहिणीच्या उपचारासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने 24 सप्टेंबर रोजी तिला बिअर पाजली. ती दारूच्या नशेत आल्यावर तिच्या गळा दाबून तिची हत्या केली.
हत्येनंतर त्याने मृतदेह अनंतपूरसमोर रिंगरोडच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकून दिला. मोबाईल कॉल डिटेल्स, सीसी कॅमेरे स्कॅन केल्यानंतर आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले. पतीसोबत वाद झाल्याने ती मामाकडे राहत होती. पण नंतर तिचं शेजारच्याच व्यक्तीसोबत जुळलं.