नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटरवरून पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. या संदेशात मोदींनी म्हटले आहे की, मनोहर पर्रिकर यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. ते एक खरे देशभक्त आणि अतुलनीय प्रशासक होते. सर्वांनाच त्यांच्या कामाचे कौतुक वाटायचे. त्यांची नि:स्पृह देशसेवा आगामी पिढ्यांच्याही कायम स्मरणात राहील. पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळेच गोव्यात अनेक वर्षे त्यांचे वर्चस्व राहीले, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी देशभरात दुखवटा पाळला जाईल. या काळात दिल्लीसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच पर्रिकर यांच्यावर उद्या गोव्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
Shri Manohar Parrikar was an unparalleled leader.
A true patriot and exceptional administrator, he was admired by all. His impeccable service to the nation will be remembered by generations.
Deeply saddened by his demise. Condolences to his family and supporters.
Om Shanti. pic.twitter.com/uahXme3ifp
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 17, 2019
Shri Manohar Parrikar was the builder of modern Goa. Thanks to his affable personality and accessible nature, he remained the preferred leader of the state for years. His pro-people policies ensured Goa scales remarkable heights of progress.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 17, 2019
India will be eternally grateful to Shri Manohar Parrikar for his tenure as our Defence Minister. When he was RM, India witnessed a series of decisions that enhanced India’s security capacities, boosted indigenous defence production and bettered the lives of ex-servicemen.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 17, 2019
गोव्यातील म्हापशात १३ डिसेंबर १९५५ ला मनोहर पर्रिकर यांचा जन्म झाला होता. मुंबई आयआयटीमधून पर्रिकर इंजिनिअर झाले. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय होते. १९९४ मध्ये पर्रिकर पणजीमधून आमदार झाले. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मोदी सरकारमध्ये देशाचे संरक्षणमंत्री झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.