Manish Sisodia Bail: दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 17 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
मनीष सिसोदिया हे 17 महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधातील सुनावणी असून सुरु झाली नाही, असे म्हणत ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यात सिसोदियांचे संबंध असल्याचे महत्वाचे दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला.
मनीष सिसोदीयांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने 4 अटी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये पहिली अट म्हणजे त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारे पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही. तिसरी अट सिसोदियांना आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तर चौथी म्हणजे 10 लाखांच्या खासगी मुचलका भरावा लागणार आहे.
#WATCH | Delhi | On Supreme Court grants bail to AAP leader Manish Sisodia in the excise policy irregularities case, Advocate representing Manish Sisodia, Rishikesh Kumar says, "The court has said that if you have the evidence then there is no case of tampering. If you have kept… pic.twitter.com/ftnTscRclo
— ANI (@ANI) August 9, 2024
उत्पादन शुल्कात अनियमितता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदियांना जामिन दिल्यानंतर त्यांचे वकिल ऋषिकेश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल. तुमच्याकडे पुरावा आहे तर त्यात छेडछाडीचा संबंध येत नाही. तुम्ही यांना इतका काळ तुरुंगात ठेवलंय हे जामिनाच्या सिद्धांतांच्या विरोधात आहे. ईडीचे प्रकरण असो वा कलम 45 तेथे जामिनाटा मुख्य नियम लागू होते. हे ध्यानात घेऊन सिसोदिया 17 महिने तुरुंगात राहिले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने ईडीचे आक्षेप फेटाळले आणि सिसोदियांना जामीन दिला. सिसोदियांचे ट्रायल 6 ते 8 महिन्यात संपेल असे ईडीने कोर्टात म्हटलंय पण तसे वाटत नसल्याचे कोर्टाने सांगितले.
मनीष सिसोदियांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करत आहेत. मनीष सिसोदियांचे 17 महिने फुकट गेले त्यांचा हिशोब कोण देणार? असा प्रश्न यावेळी आपचे नेता संजय सिंह यांनी विचारला.
The entire nation rejoices today as the hero of Delhi's education revolution, Manish Sisodia, has been granted bail. I express my heartfelt gratitude to the Hon’ble Supreme Court.
Manish bhai was kept behind bars for 530 days. His crime being that he dreamt of giving a bright… pic.twitter.com/aVZF211XhW
— Raghav Chadha (@raghav_chadha) August 9, 2024
दिल्लीतील शिक्षण क्रांतीचे नायक मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण देशात आज आनंदाचे वातावरण आहे. याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी असल्याची माहिती राघव चड्डा यांनी दिली. मनीष सिसोदियांना 530 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यांनी गरिबांचे भविष्य उज्ज्वल केले इतकीच त्यांची चूक होती. लाडक्या मुलांनो,तुमचे मनीष काका पुन्हा येतायत, असे ट्वीट राघव चड्डा यांनी केलंय.