नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची दिल्लीत भेट घेतली.आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीला ममता बॅनर्जी यांचा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी अडवाणी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ममता यांनी वाकून अडवाणींचे पाय धरले आणि त्यांचा आशीर्वाद घेतले. यानंतर ममता अडवाणी यांच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसल्या.
अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. वाजपेयी सरकारमध्ये ममता सत्तेत भागीदार होत्या. अटलबिहार वाजपेयी आपल्यासाठी पितृतुल्य असल्याचे ममतांनी म्हटलं होतं. आता ममतांनी अडवाणींचे पाय धरत आशीर्वाद घेण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.