हे साधंसुधं क्रेडिट कार्ड नाही, जितके जास्त पैसे खर्च करणार तितके परत मिळणार.... काय आहे योजना?

असे काही क्रेडिट कार्ड आहेत, जे ग्राहकांना अतिरिक्त ऑफर देतात.

Updated: Jun 29, 2021, 05:44 PM IST
हे साधंसुधं क्रेडिट कार्ड नाही, जितके जास्त पैसे खर्च करणार तितके परत मिळणार.... काय आहे योजना? title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोकं असे असतात की, ते क्रेडिट कार्डचा वापर करुन आपला खर्च करतात आणि नंतर मग त्या कार्डचं बिल भरतात. हे कार्ड लोकांना त्यांच्याकडे हातात पैसे नसताना ही, त्यांना क्रेडिटवर पैसे देऊन मदत करतात. क्रेडिट कार्डचे बरेच प्रकार असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, कॅशबॅक देणारे देखील कार्ड असतात? म्हणजेच प्रत्येक खरेदीवर पैसे खर्च करुन देखील तुम्हाला पैसे कमवता येते. या कार्डचा वापर करुन तुम्ही किती पैसे खर्च केले, त्यानुसार तुम्हाला कॅशबॅक मिळेल. त्यामुळे अशा प्रकारचे कार्ड हे खरेदीची आवडत असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्याला माहित आहे की, आता खर्च करा आणि पुढच्या महिन्यात पैसे भरा. त्यामुळे आता हे सांगितल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवू शकतो की, सर्व क्रेडिट कार्ड तर एकाच प्रकारची असतात. मग हे कॅशबॅक क्रेडिट कार्ड काय आहे?

परंतु असे काही क्रेडिट कार्ड आहेत, जे ग्राहकांना अतिरिक्त ऑफर देतात. त्यात काही कार्ड गिफ्ट्स देतात तर काही कार्ड पॅइंट्स किंवा सूट देतात.

यामध्ये असे काही कार्ड आहेत, जे खर्च केल्यावर ग्राहकांना कॅशबॅक देतात.

1 कॅशबॅक क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

प्रत्येक कॅशबॅक क्रेडिट कार्ड हा  यूनीक असतो, त्याचे एक महत्व असते. परंतु त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्ड तुमच्या कमीत-कमी खर्चावर देखील तुम्हाला कॅश बॅग देतो.

उदाहरणार्थ, समजा आपण तुम्ही 1000 रुपयांची शॉपिंग केली तर त्याचा 1 टक्के किंमत त्या कार्डवर परत म्हणजेच तुमच्या कार्जमध्ये 10 रुपये येतील. त्याच प्रमाणे काही काही कार्डे असे असतात जे त्यापैक्षा ही अधिक कॅशबॅक ऑफर देतात. यामध्ये तेल खरेदी करण्यावर किंवा किराणा सामानावर अधिक कॅशबॅक दिले जाताता.

२ घरगुती खर्चावर अधिक नफा

समजा रमेशने क्रेडिट कार्डसवर किराणा सामान विकत घेतला आणि घराची वीज, पाणी आणि फोनची बिले भरली.  रमेशने या महिन्यात जास्त पैसे खर्च केले. परंतु अशा परिस्थितीत ही कॅशबॅक त्याला खूप मदत करते.

समजा, रमेशने एका महिन्यात 15 हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे खर्च केले. यातील 1 टक्के जोडल्यास क्रेडिट खात्यात 150 रुपये कॅशबॅक मिळेल.

3 प्रत्येक खर्चावर कॅशबॅक उपलब्ध

साधारणपणे, प्रत्येक खर्चावर कॅशबॅक उपलब्ध आहे. रमेश आपल्या क्रेडिट कार्डसह वीज, पाणी किंवा घरातील इतर बिले भरतो, किराणा सामान खरेदी करतो, चित्रपटाची तिकिटे खरेदी करतो.

कॅशबॅक कार्ड असल्याने रमेशला प्रत्येक खरेदीवर खर्च केलेल्या पैशातील काही रक्कम परत मिळते. परंतु रमेशने त्या कार्डमधून पैसे काढले तर त्याला कॅशबॅक मिळणार नाही.

4 कॅशबॅक कार्डचा फायदा काय?

काही क्रेडिट कार्ड किराणा कंपन्यांशी करार करतात. त्यामुळे त्यांकडे ग्राहकांना खरेदी केली तर, या कंपन्यांकडून ग्राहकांना अधिक कॅशबॅक उपलब्ध होते. त्यामुळे परताव्याची ही रक्कम सामान्य परतावा किंवा कॅशबॅकपेक्षा 2-4 पट जास्त असू शकते.

यामुळेचऑफर असलेल्या कंपनीच्या पेट्रोल पंपांवरुन तुम्ही पेट्रोल भरलात तरा ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जर रमेश पहिल्या 2 महिन्यांत ठराविक रकमेपेक्षा जास्त खर्च करत असेल तर त्याला जास्त दराने कॅशबॅक मिळेल.

5 अशा कार्डासाठी वर्षाला काही शुल्क आहे का?

अशी अनेक कार्डे आहेत. ज्यात वार्षिक फी देण्याचे नियम आहेत, तर काही कार्डे विनामूल्य आहेत. त्यामुळे कार्ड घेताना, आपण हे कार्ड विनामूल्य आहे की, चार्ज करणारे आहे हे बँकेला विचारावे.

परंतु हे लक्षात ठेवा की, ज्या कार्डवर वार्षिक फी घेतली जाते, त्यांना अधिक कॅशबॅक मिळते. म्हणजेच जर रमेश वार्षिक फीसह कॅशबॅक कार्ड घेत असेल तर, त्याला  शॉपिंगवर अधिक पैसे कमविण्याची संधी आहे.