तरुणीने पुलावरुन मारली नदीत उडी, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

पुलावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Updated: Jun 29, 2021, 03:44 PM IST
तरुणीने पुलावरुन मारली नदीत उडी, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिज (Signature Bridge) वरुन उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या युवतीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ही युवती रेलिंग ओलांडून नदीत उडी मारताना दिसत आहे. युवतीचा आत्महत्येचा हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. 

आत्महत्या करणाऱ्या या तरुणीचं नाव हिमांशी आहे. तिने आत्महत्या केली याचं कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणात पुढचा तपास करत आहे. (Himanshi Suicide Case)