'21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण... ' सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली 'ती' शपथ

महाकुंभ 2025 मध्ये सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या साध्वी हर्षा रिचारियाच्या आईला 21 वर्षांपूर्वी तिच्या मुलीने घेतलेली शपथ आठवली. त्यांनी सांगितले की, 2004 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान त्यांनी हर्षाला एका गोष्टीसाठी थांबवले होते. तेव्हा सुंदर साध्वीने घेतलेली शपथ आणि यंदाचा महाकुंभ 2025 चा मेळा याचा काय संबंध आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 16, 2025, 05:12 PM IST
'21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण... ' सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली 'ती' शपथ title=

प्रयागराजच्या संगम शहरात महाकुंभ 2025 सुरू झाल्यापासून, सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया चर्चेत आहे. सोशल मीडियावर सुंदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होत आहेत. आता हर्षाच्या पालकांनी अलिकडच्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट शेअर केली आहेत. ज्यामुळे तिचा आणि महाकुंभाचा संबंध काय याची ओळख पटली आहे. साध्वीच्या आईला २१ वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात हर्षाने घेतलेली शपथ आठवली.

 साध्या कुटुंबातील हर्षा रिचारियाचे बीबीएचे शिक्षण घेतले आहे आणि अँकरिंगचा कोर्स देखील केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील दिनेश रिचारिया यांनी सांगितले की, ती पूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करायची.  2004 च्या उज्जैन कुंभमेळ्यानंतर साध्वी यांच्या वडिलांचा कल अध्यात्माकडे वळला आणि आता ते कायमचे भोपाळमध्ये स्थायिक झाले आहेत.

केदारनाथची यात्रा

हर्षाची आई किरण रिचारिया घरून एक बुटीक चालवते. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, हर्षला लहानपणापासूनच धर्म आणि अध्यात्माकडे कल होता. हर्षाने 3 वर्षांपूर्वी केदारनाथच्या यात्रेदरम्यान तिचे जीवन बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर, त्यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये वेळ घालवायला सुरुवात केली आणि समाजसेवेसाठी एक एनजीओ देखील स्थापन केला.

हर्षा कोणाशी लग्न करशील?

वडिलांनी सांगितले की, त्यांनी हर्षासाठी दोन मुले पाहिली आहेत. एक डेहराडूनमध्ये आणि दुसरा नाशिकमध्ये. ते लवकरच हर्षाचे लग्न निश्चित करणार आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले की, हर्षाला साध्वी म्हणून ट्रोल करणे थांबवावे कारण तिने संन्यास घेतलेला नाही तर फक्त गुरुदीक्षा घेतली आहे.

21  वर्षांचे स्वप्न

हर्षाच्या आईने सांगितले की, 2004 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांनी हर्षाला आंघोळ करण्यापासून रोखले होते. त्यावेळी हर्ष म्हणाला होता, बघ आई, हे माझं स्वप्न आहे, एके दिवशी मी हत्तीवर बसून कुंभमेळ्याला नक्कीच जाईन. आज हे स्वप्न पूर्ण होताना पाहून त्याची आई भावुक झाली. त्याने असेही सांगितले की हर्षाला पहिल्यांदा साध्वीच्या पोशाखात पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले.