तीच तारीख, तीच पद्धत! 6 वर्षांनंतर बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील 5 जणांचा गळफास

MP Incident : मध्यप्रदेशमधल्या अलीराजपूर जिल्ह्यातील रावडी गावात एका घरात पाच जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सामुहिक आत्महत्येच्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 

राजीव कासले | Updated: Jul 1, 2024, 03:42 PM IST
तीच तारीख, तीच पद्धत! 6 वर्षांनंतर बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील 5 जणांचा गळफास title=

MP Incident : मध्य प्रदेशमधल्या एका अलीराजपूरमध्ये (Alirajpur) घडलेल्या एका घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. इथल्या एका घरात पाच जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आत्महत्या केलेले पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. यात पती-पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या की आत्महत्या आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर याचा खुलासा होणार आहे. या घटनेने दिल्लीत 1 जुलै 2018 ला दिल्लीत झालेल्या बुऱ्हाडी हत्याकांडाची (Burari Kand)  पुनरावृत्ती झाली आहे. 

मध्यप्रदेशमधल्या (MP) अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा इथल्या रावडी गावातील ही घटना आहे. मृतांमध्ये कुटुंब प्रमुख राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी, मुलगा अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. नातेवाईकांनी या सर्वांच्या हत्येची शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दिल्लीतलं बुऱ्हाडी हत्याकांड
दिल्लीतल्या बुऱ्हाडी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 1 जुलैला दिल्लीत हे हत्याकांड झालं होतं, याला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. 30 जून 2018 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चुंडावत कुटुंबतील तब्बल 11 जणांनी आत्महत्या केली होती. 

यातली दहा लोकं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले होते. तर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या आजीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 1 जुलै 2018 च्या सकाळी 11 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. बुऱ्हाडी हत्याकांड नेमकं का घडलं यावर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आलं. कुटुंबातील प्रमुख ललित भाटिया यांनी जादू-टोणाच्या आहारी जाऊ संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यासाटी मजबूर केलं असा दावा केला जात आहे. बुऱ्हाडी हत्याकांडावर बेवसीरिजही निघाली होती.