मुंबई : जगात असे अनेक आजार आहेत, ज्यावर पूर्णपणे उपचार निघालेले नाही. परंतु बऱ्याचदा वैद्यकशास्त्रात अशी परिस्थिती निर्माण होते, की ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसते. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे. लिम्फेडेमा हा एक असा आजार आहे, ज्याच्यावर अद्याप कोणताही उपचार निघालेला नाही. या आजाराला सामान्य भाषेत हत्तीचे पाय असेही म्हणतात. हा जगातील सर्वात अनोखा आजार असल्याचे म्हटले जाते.
परंतु या उपचार नसलेल्या आजारावही डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या ऑपरेशनपूर्वी रुग्णाने देशातील सर्व मोठ्या रुग्णालयांना भेट दिली होती, परंतु मॅक्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हे अशक्य काम शक्य करून दाखवले आहे.
लिम्फेडेमा आजाराने त्रासलेल्या व्यक्तीचे नाव अमित कुमार शर्मा आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला लिम्फेडेमा नावाचा आजार झाला होता.
या आजारात रुग्णाचा पाय थोड्याच दिवसात हत्तीच्या पायासारखा होऊ लागला. अमितने गेल्या 10 वर्षांपासून देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या, त्यामुळे त्याच्या खिशात एकही पैसा शिल्लक नव्हता. या आजारामुळे त्याला चालताही येत नव्हते, ज्यामुळे त्यांची नोकरीही गेली. त्याच्याशिवाय घरात कमावणारे कोणी नव्हते.
त्यानंतर अमितने ऑगस्ट 2021 मध्ये मॅक्स हॉस्पिटल पटपरगंजमधील डॉक्टरांना दाखवले आणि तेव्हापासून त्याची शस्त्रक्रिया सुरू झाली.
अमितवर उपचार करण्यासाठी मॅक्स हॉस्पिटलच्या 25 डॉक्टरांच्या टीमने 6 महिन्यांत 18 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियांना 90 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
जेव्हा अमित मॅक्स हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याच्या पायाचे वजन सुमारे 50 किलो होते, जे आता सुमारे 23 किलो झाले आहे. म्हणजेच शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पायाचे वजन 27 किलोने कमी झाले आहे.
डॉ. मनोज, एमडी, मॅक्स हॉस्पिटल, पदपरगंज यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासाठी ही एक पूर्णपणे नवीन केस होती आणि अमितवर याआधीच अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले होते, त्यामुळे केस अधिकच बिघडत चालली होती. पण आमच्या यशस्वी शस्त्रक्रियांनंतर अमित आता चालू शकतो.
तुम्ही या आजाराला कर्करोगासारखे धोकादायक म्हणू शकता. यामध्ये अपघातात काही नसांना इजा होते, त्यामुळे रक्तप्रवाह होऊ शकत नाही आणि रक्त एका ठिकाणी जमा होऊ लागते. त्यामुळे पायाचा आकार सतत वाढू लागतो आणि त्याचा थेट परिणाम मेंदू आणि हृदयावर होतो.
हे एक प्रकारचे स्लो पॉयझन आहे, जे हळूहळू रुग्णाला मारते. मात्र, आता या ऑपरेशननंतर अमितला चालता येत आहे. तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत त्यांच्या दोन्ही पायांचा आकार जवळपास सारखाच होणार आहे.