उत्तर प्रदेशात मदरशांबाबत सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये मोठे बदल

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या निबंधकांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

Updated: Mar 25, 2022, 02:38 PM IST
उत्तर प्रदेशात मदरशांबाबत सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये मोठे बदल title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार सत्तेत आली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

नवीन सत्रापासून प्रत्येक मदरशात वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायले जाणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या निबंधकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. याशिवाय आता प्रत्येक मदरशात शिक्षकाच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

मदरसा शिक्षण परिषदेच्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधाही नव्या सत्रापासून सुरू करण्यात येणार आहे. मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबाबतही बोर्डाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या अंतर्गत मूलभूत शिक्षण परिषदेच्या धर्तीवर आता मदरसा बोर्डही 6 विषयांच्या परीक्षा घेणार आहे. त्याचबरोबर मदरसा शिक्षण परिषदेच्या परीक्षा 14 मे ते 27 मे या कालावधीत होणार आहेत.

कोरोना महामारीमुळे उत्तर प्रदेशातील मदरशांमध्येही ऑनलाइन शिक्षणाला मान्यता देण्यात आली होती. मदरसा एज्युकेशन कौन्सिलने ऑनलाइन अभ्यासासाठी सरकारकडे मंजुरी मागितली होती.