मुंबई : Omicron या कोरानाच्या नवीन प्रकारामुळे जगभरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. एवढंच काय तर भारतात देखील याचे रुग्ण सापडले आहेत. बंगळुरू येथील 46 वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले. स्वत: ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले परंतु त्यांनी न घाबरता ते सेल्फ-आयसोलेशनमध्ये गेले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, कानपूरमधील एका डॉक्टरने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची इतकी धास्ती घेतली की, त्याने आपले कुटुंब संपवले. ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी हृदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'ओमिक्रॉन हा सगळ्यांना मारेल.'
त्यानंतर त्याने आपली बायको आणि दोन मुलांची हत्या केली. कल्याणपूरच्या दिव्यता अपार्टमेंटमध्ये ३ डिसेंबर रोजी झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना खुनी डॉ. सुशीलचे महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. घटनेच्या दिवशी त्याचे शेवटचे ठिकाण अटल घाट येथे सापडले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीत तो अटल घाटाकडे जाताना दिसत आहे, मात्र तो तेथुन पुन्हा येताना दिसला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता आता नाकारता येत नाही. मात्र आतापर्यंतच्या तपासात डॉक्टर जिवंत किंवा मृत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
डीसीपी पश्चिम बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर डॉ. सुशील दुपारी3.27 वाजता अटल घाटाकडे जात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तिथे डॉक्टर नदीच्या पाण्याजवळ गेलेले पाहायसा मिळाले, ते तेथे काही वेळ बसले, मग परत चढून आले. त्यानंतर ते उद्यानात फिरत बसले. त्यानंतर 4.27 वाजता ते नदीच्या काठावर जाऊन बसले. त्यानंतर ते तेथून बाहेर पडलेले दिसले नाही.
त्यामुळे डॉक्टरच्या आत्महत्येची शक्यता आणखी वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या शोधात अटल घाट ते फतेहपूर जिल्ह्य़ातील गंगा काठावरील पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या शोधासाठी पाच पथके कार्यरत आहेत.
याच प्रकरणात आतापर्यंत डॉक्टरांशी संबंधित अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉक्टरांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी रुग्णालयातील सहकाऱ्यांकडेही तासन्तास डॉक्टरांची चौकशी केली, डॉक्टरांच्या कॉल डिटेल्समध्येही पोलिसांना कोणताही विशिष्ट क्रमांक सापडला नाही.
इंद्रनगरमधील दिव्यता अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. सुशील कुमार यांनी यापूर्वी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली होती. हत्येनंतर भावाला निरोप पाठवून तिहेरी हत्याकांडाची माहितीही दिली होती. सुशील कुमार रामा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. ते पत्नी चंद्रप्रभा, मुलगा शिखर आणि मुलगी खुशीसोबत अपार्टमेंटमध्ये राहत होता.
या डॉक्टरने आपल्या बायकोची हातोडीने हत्या केली आणि मुलगा आणि मुलीचा गळा दाबून मारून टाकले. डॉक्टरने त्याच्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली. त्यानंतर तो डॉक्टर घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळावरून पोलिसांना सापडलेल्या डायरीत लिहिलं आहे की, 'आता आणखी कोविड नाही. हा कोविड सर्वांचा जीव घेईल. यापुढे मृतदेह नाही मोजायचे.'
त्याने लिहिलेल्या या नोटमध्ये त्याने पुढे लिहिले की, 'मला असाध्य आजार झाला आहे. मला आता पुढचं माझं भविष्य दिसत नाही. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी माझ्या कुटुंबाला संकटात सोडू शकत नाही. मी सर्वांना मुक्त करणार आहे. मी एका क्षणात सर्व संकट दूर करत आहे. माझ्या मागे कोणीही संकटात सापडलेले मला चालणार नाही. माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. असाध्य डोळ्यांच्या आजारामुळे मला असे पाऊल उचलावे लागले आहे. शिकवणे हा माझा व्यवसाय आहे. मग डोळे नसताना मी काय करू?"