Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरमधून, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना करनाल लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्री आणि योगेंद्र चंदोलिया यांना उत्तर पश्चिममधून दिल्लीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 20 जागा
या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक वीस जागांचा समावेश आहे. यात युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ, सुजय विखे पाटीर, मिहिर कोटेचा, सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्यांदाच खासदारकीचं तिकिट देण्यात आलंय.
महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर
नंदुरबार - हिना गावित
धुळे - सुभाष भामरे
जळगाव - स्मिता वाघ
रावेर - रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
जालना - रावसाहेब दानवे
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा
पुणे - मुरलीधर मोहळ
अहमदनगर - सुजय विखे पाटील
लातूर - सुधाकर सुंगारे
बीड - पंकजा मुंडे
माढा - रणजित नाईक निंबाळकर
सांगली - संजय काका पाटील
महाराष्ट्रातून पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट
महाराष्ट्रातून 5 विद्यमान भाजप खासदारांचे तिकीट कापलं गेलंय. जळगाव, बीड आणि मुंबईतील दोन मतदारसंघातील खासदारांना घरी बसवण्यात आलंय. बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलंय. जळगावमध्ये उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ या नव्या उमेदवार असतील. तर अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचेच चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.
11 राज्यातील 74 उमेदवार
महाराष्ट्र - 20
गुजरात - 7
दिल्ली - 2
हरियाणा - 6
हिमाचल प्रदेश - 2
कर्नाटक - 20
सांसद - 5
यूके - 2
तेलंगाना - 06
त्रिपुरा -1
दिल्लीत दोन जागा
पूर्व दिल्ली – हर्ष मल्होत्रा
उत्तर पश्चिम दिल्ली – योगेंद्र चंदोलिया
गुजरातमध्ये सात उमेदवार जाहीर
साबरकांठा – भीखा जी दुधा जी ठाकोर
अहमदाबाद पूर्व - हंसमुख भाई सोमा भाई पटेल
भावनगर - निमुबेन बम्भानिया
वडोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट
छोटा उदयपुर- जशु भाई भीलु भाई राठवा
सूरत – मुकेश भाई चंद्रकांत दलाल
वलसाड – धवल पटेल