VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 25, 2024, 01:04 PM IST
VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय? title=
lok sabha elections 2024 Why did Prime Minister Modi remember his first election victory Rajkot video Share social media

Lok Sabha Elections 2024 : लवकरच लोकसभा निवडणुकी 2024 चे रणशिंग फुकलं जाणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते निवडणुकीसाठी अर्ज भरताना दिसणार आहे. हा व्हिडीओ 2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील म्हणजे तब्बल 22 वर्षांपूर्वीचा आहे. 28 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक 2024 होणार आहे. मोदींनी 22 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारीला पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. (lok sabha elections 2024 Why did Prime Minister Modi remember his first election victory Rajkot video Share social media)

2002 गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत मोदी म्हणाले की, किती छान योगायोग आहे. मी आज 22 वर्षांनी या तारखेमध्ये दोन दिवस गुजरात आणि राजकोटच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 वर्षांपूर्वी राजकोटमधून पहिली निवडणूक लढवली होती. 

हा व्हिडीओ शेअर करत मोदींनी लिहिलं आहे की, 'माझ्या हृदयात राजकोटबद्दल नेहमीच खास स्थान आहे. या शहरातील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पहिल्यांदा निवडणुकीत जिंकून दिलं. तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करतोय. हा देखील आनंदाचा योगायोग आहे की मी गुजरातमध्ये आहे आणि एक कार्यक्रम राजकोटमध्ये आहे.'

हा व्हिडीओ मोदी आर्काइव्ह नावाच्या हँडलवर शेअर केल्यानंतर मोदी यांनी आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला आहे. या हँडलवर पंतप्रधान मोदींशी संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग, पत्रे, वर्तमानपत्रातील कटिंग्ज आणि इतर गोष्टी शेअर करण्यात येत असतात.