नवी दिल्ली : भाजपकडून मंत्री राहिलेले राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे. भाजपने लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राजवर्धन राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसने राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत ३२५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या विरोधात काँग्रेसकडून राष्ट्रकूल खेळाडू कृष्णा पूनियाला जयपूर ग्रामीणमध्ये लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे.
कृष्णा पूनियाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत कृष्णा पूनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. कृष्णा पूनिया सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कृष्णा पुनियाची थेट लढत राज्यवर्धन राठोड यांच्याशी होणार आहे.
ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड केंद्र सरकारमध्ये क्रीडा व युवककल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आहेत. ते जयपूर ग्रामीणचे खासदार आहेत. काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे.