उमा भारती आणि प्रज्ञा सिंह गळाभेट घेऊन ढसाढसा रडल्या

उमा भारती यांनी भोपाळच्या भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांची भेट घेतली. 

Updated: Apr 29, 2019, 03:33 PM IST
उमा भारती आणि प्रज्ञा सिंह गळाभेट घेऊन ढसाढसा रडल्या  title=

भोपाळ :  लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशच्या भोपाळमधील जागेवर मोठी लढत होत आहे. इथे भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा नेत्या उमा भारती यांनी भोपाळच्या भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांची भेट घेतली. यावेळी दोघींनाही यावेळी अश्रू अनावर झाले होते. 

 यावेळी प्रज्ञा यांच्या डोळ्यातून पाणी आले. यावेळी उमा यांनी बराच वेळ साध्वी यांची गळाभेट घेतली.

साध्वी प्रज्ञा यांच्या डोळ्यातील पाणी पाहून उमा भारती देखील ढसाढसा रडू लागल्या. 'अरे हे काय झाले ?' असे म्हणत पुन्हा दोघींनी एकमेकांची गळाभेट घेतली. उमा भारती यावेळी भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी यावेळी साध्वी प्रज्ञा यांचे पाय धरले.