पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला, 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 14 लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. 

Updated: May 5, 2019, 07:45 AM IST
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला, 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला title=

लखनऊ : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 14 लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. या ठिकाणच्या निवडणुकीचा प्रचार संपला असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची नावे आहेत. पाचव्या टप्प्यातील प्रचार शनिवारी पाच वाजता संपला. यामध्ये 7 राज्यांतील 51 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या 7, राजस्थान 12, बंगाल 7, बिहारच्या 5, जम्मू काश्मीर 2, झारखंडच्या 4 जागांवर मतदान होणार आहे. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे पुन्हा एकदा लखनऊ मतदार संघातून आपले नशिब आजमावत आहेत. त्यांची स्पर्धाही सपा-बसपा आघाडीच्या उमेदवार पूनम सिन्हा आणि काँग्रेस उमेदवार कलकी पीठचे महंत आचार्य प्रमोद कृष्णम यांची आहे. गेल्या निवडणुकीत राजनाथ या ठिकाणी 72 हजार मतांनी जिंकले होते. यावेळी त्यांना आपली जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. साधारण तीन दशके या ठिकाणी भाजपाचीच सत्ता आहे. 1991 पासून इथे भाजपा जिंकत आहे. 

गांधी परिवाराची परंपरागत जागा रायबरेली आणि अमेठीत निवडणूक निकाल बदलू शकण्याची शक्यता कमी आहे. रायबरेलीहून सोनीया गांधी पाचव्या वेळेस निवडणूक लढवत आहेत. इखे भाजपाने काँग्रेसचे दिनेश सिंह हे त्यांच्या विरोधात असून ते किती मोठं आव्हान तयार करतात हे पाहणं महत्त्वाचे मित्र आहेत. 

या टप्प्यात काँटे की टक्कर अमेठीत पाहायला मिळणार आहे. इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची लढाई केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर स्मृती इराणी या अमेठीत ठाण मांडून आहेत. त्यांच्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी या ठिकाणी रोड शो केला. मुख्यमंत्री योगी यांच्यासहित अनेक नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.