मुंबई : २०२० या नवीन वर्षाचं सगळीकडे उत्साहात स्वागत होत आहे. नवीन वर्ष उजाडतानाच यावर्षी किती आणि कोणत्या सुट्ट्या आल्या आहेत हे प्रत्येक नोकरदार वर्गासाठी औत्सुक्याचं असतं. यंदाच्या वर्षातल्या बऱ्याच सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. २०२० मध्ये २६ जानेवारी रविवारी, बकरी ईद शनिवारी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी, पतेती शनिवारी, गणेश चतुर्थी शनिवारी आणि नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन शनिवारी आलं आहे.
१ जानेवारी- मंगळवार- नवीन वर्ष
१९ फेब्रुवारी- बुधवार- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)
२१ फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्र
१० मार्च- मंगळवार- होळी, धुलीवंदन
२५ मार्च- बुधवार- गुढी पाडवा
२ एप्रिल- गुरुवार- श्रीराम नवमी
१० एप्रिल- शुक्रवार- गुड फ्रायडे
१४ एप्रिल- मंगळवार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे- शुक्रवार- महाराष्ट्र दिन, कामगार दिन
७ मे- गुरुवार- बुद्ध पौर्णिमा
२५ मे- सोमवार- रमजान ईद
३ ऑगस्ट- सोमवार- रक्षाबंधन
११ ऑगस्ट- मंगळवार- जन्माष्टमी
२ ऑक्टोबर- शुक्रवार- गांधी जयंती
२६ ऑक्टोबर- सोमवार- दसरा
३० ऑक्टोबर- शुक्रवार- ईद
१६ नोव्हेंबर- सोमवार- भाऊबीज (दिवाळी)
३० नोव्हेंबर- सोमवार- गुरु नानक जयंती
२५ डिसेंबर- शुक्रवार- ख्रिसमस